सोलापूर- उजनीहून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आणण्यात आलेल्या पाईपलाइनला टेंभुर्णी बायपासजवळ मोठी गळती लागली आहे. त्यामुळे या परिसरात हवेत उंचच्या उंच पाण्याचे फवारे उडत असल्याचे दृश्य वाटसरूंना पाहायला मिळत आहे.
उजनीच्या पाईपलाईनला लागली गळती; हवेत उंचच उंच फवारे - ujani dam
तुडुंब भरलेल्या उजनी धरणातून सोलापूरसाठी पूर्ण क्षमतेने पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहाटेपासून उजनीच्या पुढे आल्यानंतर टेंभुर्णी बायपास जवळ सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला मोठी गळती लागली आहे.
सध्या राज्यात सगळीकडे पुराचे थैमान असले तरी सोलापूर शहरात मात्र पाणीटंचाई आहे. सोलापूरला सध्या नळाला पाच दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. ही पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने सध्या महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी तुडुंब भरलेल्या उजनी धरणातून सोलापूरसाठी पूर्ण क्षमतेने पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहाटेपासून उजनीच्या पुढे आल्यानंतर टेंभुर्णी बायपास जवळ सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला मोठी गळती लागली आहे.
राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात मोठा पाऊस पडला असला तरी सोलापूर जिल्हा मात्र कोरडाच राहिलेला आहे. त्यामुळे आजही सोलापूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर सोलापूर शहरातही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी सोलापूरकरांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे त्यात व्यत्यय येत आहे. आज दिवसभर ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात येणार असल्याचे महानगर पालिकेकडून कळविण्यात आले आहे.