महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक... अमरावती जिल्ह्यात पुन्हा ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार - amravati physical abused on seven years old girl

वनजा या छोट्या गावात पीडित चिमूकली ही आपल्या मैत्रिणीसोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. यावेळी गावातील शिवम पाचवन या २० वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाऊ या बहाण्याने दुचाकीवर बसवले. तसेच स्वतःच्या शेतात नेऊन तिच्याशी बळजबरी केली.

physical accused on seven years old girl in amravati
अमरावती जिल्ह्यात पुन्हा ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

By

Published : Sep 12, 2021, 3:04 PM IST

Updated : Sep 12, 2021, 3:13 PM IST

अमरावती -मुंबईतील साकीनाका तसेच अमरावतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरून गेले आहे. असे असतानाचा आज पुन्हा अमरावती जिल्ह्यात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका वनजा या छोट्या गावात घडली.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

काय आहे घटना?

वनजा या छोट्या गावात पीडित चिमूकली ही आपल्या मैत्रिणीसोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. यावेळी गावातील शिवम पाचवन या २० वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाऊ या बहाण्याने दुचाकीवर बसवले. तसेच स्वतःच्या शेतात नेऊन तिच्याशी बळजबरी केली. त्यामुळे पीडित आईच्या तक्रारी वरून नराधम युवकाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -हातोडीचा धाक दाखवून उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम अटकेत

दरम्यान, अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Sep 12, 2021, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details