बार्शी (सोलापूर) -तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत सदस्याने आपल्या गावातील एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आकाश पांडुरंग दळवी असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपीचा पोबारा -
बार्शी शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खांडवी या गावात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांनी गावातीलच एका महिलेवर अत्याचार केला. सोमवारी रात्री पीडिता ही लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. दरम्यान, समोरच राहत असलेल्या आकाश दळवी याने तिच्यावर बळजबरी करीत अत्याचार केला. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला असता महिलेच्या पतीला जाग आली. मात्र, या महिलेचा पती घराबाहेर येण्याअगोदरच आरोपी आकाशने पोबारा ठोकला. ही घटना 21 जूनला मध्यरात्री घडली.