सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर 4 ते 22 जुलै दरम्यान भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. दरम्यान 3 जुलै पासून ऑनलाईन दर्शन सुविधा बंद केली जाणार असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून विविध साधू-संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी 4 जुलैपासून मंदिर राहणार 24 तास खुले, ऑनलाईन दर्शन होणार बंद - सोलापूर
आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. दरम्यान प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येणे शक्य नसते. यामुळे मंदिर समितीने वारीपूर्वी आणि नंतर भाविकांना दर्शन घेता येण्यासाठी 4 जुलै पासून विठ्ठल मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्याच्या सर्वच भागात मॉन्सूनच्या पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने यावर्षी आषाढीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. दरम्यान प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने वारीपूर्वी आणि नंतर भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी येत्या 4 जुलै ते 22 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नित्यपूजा करून देवाचा पलंग काढला जाणार आहे. वारीकाळात देव भक्ताना दर्शनासाठी 24 तास उभा असतो. देवाला थकवा जाणवू नये म्हणून लोड ही देण्यात येतो. या काळात देवाचे नित्योपचार आणि पूजा बंद असतात. प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे सर्व निपोत्याचार सुरु होतात.