पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळेराज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. यात उद्योग व्यवसाय बंद झाले तर काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना वाढीव वीज बिलामुळे अजून संकट निर्माण झाले आहे. शरद पवार हे राज्य सरकारचे मार्गदर्शन म्हणून काम पाहतात. वाढीव वीज बिलाचा योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर वीज बील माफ करावे, अन्यथा पंढरपूरमध्ये शरद पवार यांना पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांनी दिला.
खासदार शरद पवार मंगळवारी (दि. 29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी) तर पवार कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे राजूबापू पाटील या तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पवार येणार आहेत.
शरद पवार यांना राज्य सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. कोरोनाकाळ सुरू झाल्यापासूनर राज्यातील आर्थिक उलाढाल टाळेबंदी व नंतर ठप्प झाली आहे. टाळेबंदी सुरू झाल्यापासून पंढरीत विठ्ठल मंदिर बंद आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे हाल सुरू आहेत. त्यात राज्यात वीज बिलाचा मुद्दा मोठा झाला आहे. ज्यादा वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. शरद पवार यांनी मध्यस्थी करुन योग्य तो मार्ग लवकर काढावा, अन्यथा पंढरपूर येथे शरद पवार यांना कार्यकर्त्यांकडून विरोध करण्याचा इशारा यावेळी दिला. विविध मागण्या असून वीज बिलांवर तोडगा निघाला नाही तर कोणीही वीज बिल भरू नये, असे आवाहन कवडे यांनी केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- घरगुती वीज धारकांना वीज बिल मध्ये 50 टक्के सुट मिळावी
- व्यवसायिक वीज धारकांना युनिट प्रमाणेच वीज बिल भरुन घेण्यात यावे
- स्थिर आकार रद्द करावा
- व्याज व व्याजाची (दंड) थकबाकी माफ करावे
- समायोजित रक्कम माफ करावी
- वहन आकार माफ करावा
- वीज शुल्क 21 टक्क्यांपर्यंत माफ करावी
हेही वाचा -रंगी रंगला श्रीरंग.. कमला एकदशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास