महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळ्यात गरजूंना मिळत आहे शिवभोजन; मदतीला धावून आलेत मुस्लीम युवक

शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण, नातेवाईक, बेघर व्यक्ती, भटके कष्टकरी वर्गातील मजूर, निवारा केंद्रात राहात असलेल्या व्यक्ती, सेवेत असलेले सफाई कर्मचारी आदींना गेल्या १५ दिवसांपासून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे देण्यात येत आहे. या कार्यात मुस्लीम युवकांकडून भरभरून मदत केली जात आहे.

corona solapur
शिवभोजन

By

Published : Apr 12, 2020, 8:37 PM IST

सोलापूर- जय महाराष्ट्र मित्रमंडळ व शिवसेनेच्या वतीने करमाळ्यात शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात श्रमदानासाठी मुस्लीम युवक स्वेच्छेने सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून जिवाची पर्वा न करता शहरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, निराधारांसह कष्टकरी वर्गातील ३०० भुकेल्यांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत.

जय महाराष्ट्र मित्रमंडळ व शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख प्रविण कटारिया व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. या उपक्रमात शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण, नातेवाईक, बेघर व्यक्ती, भटके कष्टकरी वर्गातील मजूर, निवारा केंद्रात रहात असलेल्या व्यक्ती, सेवेत असलेले सफाई कर्मचारी आदींना गेल्या १५ दिवसांपासून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे देण्यात येत आहे. या कामात करमाळ्यातील आकीब सय्यद, अलतमाश सय्यद, युनूस मणेरी व शाकीर झारेकरी या मुस्लीम युवकांकडून मदत दिली जात आहे.

हेही वाचा-सोलापुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; आत्तापर्यंत 208 जणांचे अहवाल निगेटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details