महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नागरिकांनी केलेल्या गर्दीवरुन त्यांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. या जीवघेण्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसही येऊन रांग लावण्याचे नियम सांगत आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By

Published : Apr 15, 2020, 4:49 PM IST

सोलापूर- जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव करुन किराणा दुकानदाराचा बळी घेतला असताना माढा शहरात संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळत आहे. माढ्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर लोकांनी यात्रेसारखी गर्दी केल्याचे दिसून आले. गोरगरीब निराधार लोक बँकेत श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान खात्यावर जमा झाले आहे का, हे पाहण्यासाठी बँकेसमोर गर्दी करत आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नागरिकांनी केलेल्या गर्दीवरुन त्यांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. या जीवघेण्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसही येऊन रांग लावण्याचे नियम सांगत आहेत. पोलीस गाडी येऊन गेली. तरीही परिस्थिती जैसे थे आहे. बँक उघडण्या अगोदरपासूनच नागरिकांनी बँक परिसर हाऊसफुल्ल करून टाकला होता.

बँक अधिकाऱ्यांनी्देखील नागरिकांना अंतराने उभे राहण्याच्या सुचना दिल्या. मात्र, ती सुचना यांना पटली नाही. त्यांनी गर्दी करणे पसंत केले. सातशे ते हजार रुपयांच्या अनुदानासाठी लाख मोलाच्या जीवाशी खेळ करणे योग्य नव्हे, हे यातून दिसत येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details