महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' वक्तव्याबद्दल राऊतांविरोधात बार्शीत मूक मोर्चा - बार्शी विधानसभा निवडणूक

भाजप नेत्याच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बार्शीचे अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात बार्शीत मूक मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनकर्ते

By

Published : Oct 18, 2019, 2:58 PM IST

सोलापूर- भाजप नेत्याच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बार्शीचे अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात बार्शीत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी, मोर्चेकरी केवळ गुन्हा दाखल करु नका तर राजेंद्र राऊतांना अटक करा अन्यथा पोलीस ठाण्यामध्येच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका संतप्त महिलांनी घेतली होती. पोलिसांनी त्याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनकर्ते


विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान बार्शीचे अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर बार्शीत महिलांमध्ये राऊत यांच्याविषयी संतापाची लाट पसरलीय. त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - 'मिशन हॅट्ट्रीक'साठी आमदार प्रणितींचा झंझावात प्रचार


दरम्यान, आपल्या त्या वक्तव्या बद्दल राजेंद्र राऊत यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत केलेले हे वक्तव्य विरोधकांच्या हाती दिलेले आयते कोलीत ठरले आहे. त्याचा मतदानावर किती परिणाम होतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा - 'टेंडरसाठी बायको विकणारी औलाद' राजेंद्र राऊतांची जीभ घसरली

ABOUT THE AUTHOR

...view details