सोलापूर- बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक येडगे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बार्शीत दोघांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात बार्शीत मांतग समाजाचे बेमुदत उपोषण माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे आणि माजी नगरसेवक किरण तौर, अशी लहूजी चौक येथे उपोषणास बसलेल्यांची नावे आहे. यावेळी पप्पू हनुमंते, नगरसेवक अमोल चव्हाण शेंडगे आदी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
दिलेल्या तक्रारीत आंतरजातीय विवाहप्रकरणी समाजबांधवाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तसेच, त्याच्यावर चुकीच्या पध्दतीने पोलिसांकडून दबाव आणला जात होता. पोलिसांनी प्रतिष्ठित व्यक्तींनाही अपमानास्पद वागणूक देत जातीवाचक वक्तव्य केल्याबाबत तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित सहायक पोलीस निरीक्षक येडगे यांच्यावर दलित प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा -टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची पाठीमागून धडक, दोन ठार