सोलापूर येथे वंदे भारत ट्रेनच थाटात शुभारंभ सोलापूर:संपूर्ण भारतीय बनावट असलेली ही ट्रेन दररोज मुंबई ते सोलापूर आणि सोलापूर ते मुंबई, मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणार आहे. शुक्रवारी रात्री वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे प्रत्येक स्थानकावर स्वागत करण्यात आले. प्रवाशांत व नागरिकांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वंदे भारत: वंदे भारत एक्सप्रेसची सर्व बनावट ही भारतात झाली आहे. चेन्नई येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारतची निर्मिती झाली आहे. रेल्वे थांबताना तसेच डोअर ओपन होण्यापूर्वी प्लॅटफार्मवर ऑटोमॅटिक पायऱ्या स्थिरावतात. त्यानंतरच दरवाजा उघडला जातो. पहिल्या डब्यातून शेवटच्या सोळाव्या डब्यापर्यंत सहज जाता येऊ शकते. सर्व खुर्च्या आरामदायी आहेत. प्रत्येक सीटिंगला मोबाईल चार्जिंग पॉइंट आहे. दोन्ही बाजूने गाडी चालवण्याची विशेष सोय आहे. त्यामुळे इंजिन बदलण्याची झंझट कायमची मिटली आहे. प्रत्येक डब्यात फोनची सुविधा असून, फोनवरून ट्रेन मॅनेजरशी प्रवासी संवाद करू शकतात.
असा आहे तिकीट दर : वंदे भारत एक्सप्रेससाठी प्रतिकिलोमीटर 2 रुपये 16 पैसे कार चेअरसाठी आहे. सोलापूर पासून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांना 985 रुपये जेवणा विना आहे. तर 1300 रुपये जेवणासह तिकीट आहे. एक्सउटव्ह चेअरसाठी 1993 रुपये तर विना जेवण तर जेवणासह 2365 रुपये सोलापूर ते मुंबई तिकीट दर आहे. सोलापूर ते पुणे दरम्यान एक्सुटीव्ह चेअरमध्ये जेवण विना 845 व जेवणासह 1575 रुपये तिकीट दर आहे. सीसी (कार चेअर मध्ये) सोलापूर ते पुणे दरम्यान 710 रुपये जेवणविना तर जेवणासह 1405 रुपये तिकीट दर आहे.
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसlचे भाडे :मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस 343 किलोमीटरचा प्रवास 5 तास आणि 25 मिनिटात पूर्ण करू शकते. भारतातील सर्वात संरक्षक मंदिर शहरे आणि नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि शनी शिंगणापूर येथील इतर तीर्थक्षेत्रे पूर्ण करण्यासाठी, सध्या 7 तास 55 मिनिटे वेळ लागतो. सुमारे दोन तासांचा वेळ कमी होणार आहे. वंदे भारत सेवा दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डूवाडी स्थानकांवरील थांब्यांसह 6 तासात सेवा पूर्ण करेल. सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून दुपारी 4.05 वाजता सुटून रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. तर सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटून दुपारी 12.35 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ती बुधवारी सीएसएमटी आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.
हेही वाचा:Vande Bharat Express Train वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी सोलापूर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे भाडे जाहीर