पंढरपूर (सोलापूर)- रविवारी अक्षय तृतीयेचा सण आहे. या सनानिमित्त पंढरपूरकरांना आंबा खरेदी करता यावा, यासाठी नगर परिषदेच्यावतीने रेल्वे मैदानावर विशेष अशी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आंबे खरेदी करण्यासाठी पंढरपूरकांनी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
रविवारी अक्षय तृतीया... आंबा खरेदी-विक्रीसाठी पंढरपुरात नगर परिषदेने केली विशेष सोय - corona
पंढरपूरमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. पंढरपूरकरांना आज अक्षय तृतीया सणानिमित्त आंबा खरेदीसाठी मोकळीक देण्यात आली आहे.
आंबा विक्री करण्यासाठी रेल्वे मैदानावर नगर परिषदेने केली विशेष सोय
पंढरपूरमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. पंढरपूरकरांना आज आंबा खरेदीसाठी मोकळीक देण्यात आली आहे. आंब्याची विक्री नगर परिषदेने ठरवून दिलेल्या रेल्वे ग्राऊंडवरील जागेत करण्याची परवानगी देण्यात आली होती.
सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेनेदेखील तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळला होता. आज जनता कर्फ्यूचा कालावधी संपला आहे.
Last Updated : Apr 25, 2020, 1:35 PM IST