पंढरपूर- राज्यासह सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्याची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच रुग्णांना उपचारासाठी विविध कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, बऱ्याचदा रुग्णांना कशा पद्धतीने बेड उपलब्ध करता येईल, याची माहिती नसते. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे प्राणही जात आहे. याच पार्श्वभूमिवर पंढरपूर येथील शिवछत्रपती तरुण मंडळाने वॉर रूम संकल्पना तयार केली आहे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यातील रुग्णाला लागणाऱ्या बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे. मंडळात तरुण कार्यकर्त्यांकडून या संकल्पनेतून शेकडो रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून दिले आहे. हे तरुण कोरोना रुग्णांना कोरोनाच्या संकटात मदतीचा हात देत आहे.
शिवछत्रपती मंडळाची 'आमची मोहीम.. तुमची साथ'..
जिल्ह्यात कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी समोर येत आहे. अशातच कोरोना काळात शिवछत्रपती तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले आहे. शिवछत्रपती मंडळाकडून 'आमची मोहीम तुमची साथ' या माध्यमातून वार रूम तयार करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार व बेड उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी मंडळातील तरुणांनी पश्चिम महाराष्ट्रातील हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांशी संपर्क साधून त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ऑक्सीजन बेड, ओटू बेड, बायपास बेड यांची यादी तयार केली आहे.
मंडळातील तरुण कार्यकर्त्यांकडून बेडचे व्यवस्थापन..