पंढरपूर -आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या नऊ पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. त्यामधील रखुमाई माता व संत निळोबा महाराज यांची पालखी शुक्रवारी (23 जुलै) परत गेली. आज (24 जुलै) पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे गोपाळकाला पार पडला. गोपाळपूर येथील गोपाळकाल्याचे मंदिर मात्र प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मानाच्या सात पालख्यांनी गोपाळपूर येथील गोपाळकाल्याच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. गोपाळकाल्याचे किर्तन महाराज मंडळींकडून करण्यात आले. गोपाळकाल्याच्या कीर्तनानंतर आषाढी वारीची सांगता करण्यात आली.
श्रीविठ्ठल मंदिरात संतांच्या पादुकांच्या भेटी-
पांडुरंगाच्या भेटीसाठी आज मानाच्या सात पालख्या मंदिरात दाखल झाल्या होत्या. विठुरायाचे दर्शन आज संतांनी घेतले. त्यानंतर श्री विठ्ठल मंदिरामध्ये संतांच्या पादुकांच्या भेटीही पार पडल्या. यामध्ये संत सोपानकाका, निवृत्ती महाराज, संत चांगावाटेश्वर महाराज, मुक्ताबाई यांच्या पादुका भेटींचा अनोखा सोहळा मंदिरात पार पडला.