पंढरपुर - दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या आषाढी एकादशी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र सह कर्नाटकातून ही भावी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. (Pandharpur Temple Donation ) दर्शनासाठी आलेले भाविक हे पांडुरंगाच्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम दान करत असतात.
तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांनी उत्पन्नात वाढ -आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवाच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करणे सुरु होते. (Pandharpur Temple Donation ) आज याची आकडेवारी जाहीर करताना यंदा गेल्या 2 वर्षीपेक्षा तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांनी देवाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
ऑनलाईन देणगीमध्ये वाढ -2019 आणि 2022 या 2 वर्षांमधल्या उत्पन्नाचा विचार केला, तर यावर्षी देवाच्या आणि मंदिरे समितीच्या उत्पन्नामध्ये जवळपास 1 कोटी 30 लाख इतकी भर भाविकांनी देणगी स्वरुपात टाकलेली आहे. याच्यामध्ये देवाच्या आणि देवीच्या, तसेच परिवार देवतांच्या पायावरील उत्पन्न हुंडीपेटी, दानपेटीमधील तसेच ऑनलाईन व मंदिर समितीच्या वतीने क्यु आर कोड याची देणगीसाठी सोय उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.