महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 6, 2021, 6:37 PM IST

Updated : Mar 6, 2021, 6:45 PM IST

ETV Bharat / state

पंढरपूर : आवास योजनेवरील स्थगिती उठवली, 892 घरांची सोडत आठ मार्चला

पंढरपूर येथील पंतप्रधान आवास योजनेत चार हजार घरकुल योजनेवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली आहे. यामुळे 892 घरांचा लॉटरी सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या घराची लॉटरी सोडत आठ मार्चला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

pandharpur Home Lottery on March 8
pandharpur Home Lottery on March 8

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर येथील पंतप्रधान आवास योजनेत चार हजार घरकुल योजनेवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली आहे. यामुळे 892 घरांचा लॉटरी सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या घराची लॉटरी सोडत आठ मार्चला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 892 घरांसाठी सुमारे 913 अर्ज आले आहे. यामुळे बेघर नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हे ही वाचा - महत्वाची बातमी : आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद

विधिमंडळात अजितदादा पवार यांनी दिली मंजुरी -

पंढरपूर आवास योजनेतील प्रकल्प भीमा नदीच्या पूररेषेत येत आहे. तसेच प्रकल्पामध्ये वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध संघटनेने तक्रार दिली होती. त्याच तक्रारींची दखल घेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिली होती. मात्र विधिमंडळ काळामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत सशर्त परवानगी दिली. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजनेची सोडत आठ मार्चला
आवास योजनेवरून भाजप व राष्ट्रवादीमध्ये घमासान -

आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रधान आवास योजना मंजूर करून आणली. त्या आवास योजनेचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. प्रकल्प अंतिम टप्प्यात स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रकल्प पूररेषेत येत असल्याची तक्रार राज्य सरकारला दिली. यामुळेच राज्यमंत्री तनपुरे यांनी प्रकल्पाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवावी म्हणून आ.परिचारक यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या समोर एक दिवस आंदोलन केले होते. या प्रकल्पावर भाजप व राष्ट्रवादी पक्ष आमने-सामने आल्याचे दिसून आले.

892 घरांची आठ मार्चला सोडत -

पंतप्रधान आवास योजनेतील चार हजार घरांची काम सुरू आहे. त्यातील 892 घरांचे काम पूर्ण करण्यात आले. त्या संदर्भातील सोडत 26 जानेवारी रोजी होणार होती. मात्र स्थगिती दिल्यामुळे आता ती सोडत आठ मार्च रोजी पंढरपूर नगरपालिकेकडून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

Last Updated : Mar 6, 2021, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details