महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर : अडीच वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारास अटक - डिजे

अल्पदरात डिजे व ऍम्प्लिफायर मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूटणाऱ्या व अडीच वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सचिन काळे, असे त्या आरोपीचे नाव आहे.

v
v

By

Published : Sep 24, 2021, 2:57 AM IST

Updated : Sep 24, 2021, 6:37 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -अल्पदरात डिजे व ऍम्प्लिफायर मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूटणाऱ्या व अडीच वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सचिन काळे, असे त्या आरोपीचे नाव आहे. मागील अडीच वर्षांपासून सचिन काळे हा फरार होता.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी

अल्पदरात डिजे व ऍम्प्लिफायर मिळवून देतो म्हणून आमिष दाखवून लूट

2019 साली पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे डीजे व ऍम्प्लिफायर मिळवून देतो, असे आमिष दाखवून पुळूज गावात एकास बोलून घेतले. त्यानंतर लुटमार करण्याच्या उद्देशाने काही जणांनी मिळून चाकू, कोयते व लाटी याचा धाक दाखवून तक्रारदारस लुटले होते. त्यानंतर तक्रारदाराने पंढरपर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सर्व आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अडीच वर्षानंतर सचिन काळे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी यापूर्वी दहा जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, सचिन काळे हा मागील अडीच वर्षांपासून पोलिसांनी गुंगारा देत होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकांनी पुळूज येथून 21 सप्टेंबर रोजी सचिन काळे याच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा -कौतुकास्पद ! 17 वर्षात एकही सुट्टी न घेता शाळेसाठी परिश्रम घेणारे 'भडकवाड गुरुजी'

Last Updated : Sep 24, 2021, 6:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details