सोलापूर - ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या 'तान्हाजी' चित्रपट हा विद्यार्थ्यांसाठी फक्त 50 रूपयात दाखविण्यात येत आहे. पंढरपूर येथील डीव्हीपीस्क्वेअर या मल्टीप्लेक्सच्या चालकांनी हा निर्णय घेतलाय.
अल्पदरात 'तान्हाजी' चित्रपट दाखवण्याचा पंढरपुरातील मल्टीप्लेक्स चालकाचा निर्णय
तान्हाजी चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी सवलतीच्या दरात दाखवण्याचा निर्णय पंढरपुरातील मल्टीप्लेक्सने घेतलाय. विद्यार्थ्यांसाठी ५० रुपयांच्या तिकीट दरात सिनेमा दाखवला जात आहे.
सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तींना तसेच विद्यार्थ्यांना ऐतिहसिक चित्रपट पाहता यावा यासाठी पंढरपूरातील डीव्हीपी मल्टीस्केअर मध्ये अल्पदरात चित्रपट दाखविण्यात येत आहे. डीव्हीपी मल्टीस्क्वेअरचे मालक अभिजीत पाटील यांनी चित्रपट अल्पदरात दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूर मावळा म्हणून तान्हाजी मालूसरे यांची ओळख आहे. तान्हाजी मालूसरे यांच्या जीवनावर आधारीत असलेला 'तान्हाजी' हा हिंदी चित्रपट रिलीज झाला आहे. 'तान्हाजी' चित्रपट हा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी होत असतानाच पंढरपुरातील मल्टीस्क्वेअर चित्रपट अल्पदरात दाखविण्यात येत आहे.