महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करताना दोनच व्यक्तींना मिळणार प्रवेश - पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक

कोरोना पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीसंदर्भात नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.

Pandharpur Election
Pandharpur Election

By

Published : Mar 22, 2021, 10:04 PM IST

पंढरपूर- कोरोना पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीसंदर्भात नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अटी अशा असणार -

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र नमुना 2 ब मध्ये दाखल करावे. तसेच त्यासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र नमुना 2 ब निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून, एका उमेदवारास जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपुर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. उमेदवार अन्य मतदार संघातील असल्यास त्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक सूचक तसेच इतर उमेदवारांना 10 सूचक याच मतदार संघातील असणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवारास पक्षाचा मूळ ‘ अ’ व ‘ब’ फॉर्म, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपुर्वी दाखल करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

उमेदवाराला गुन्हेगारीबाबत माहिती द्यावी लागणार -

उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 हजार तर अनुसूचित जाती-जमातीसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असणार आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र रुपये 100 च्या स्टँपवर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांची संपत्ती, जबाबदारी, शैक्षणिक व गुन्हेगारीविषयी माहिती देणे आवश्यक आहे. उमेदवारावरील दाखल गुन्ह्यांची माहिती उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्द करावी. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांनी गुन्हेगारीबाबत माहिती पक्षाला कळविले असल्याबाबतचे घोषणपत्र प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details