सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन्समध्ये कार्यकर्त्यांचा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येणार असल्याने संमेलना ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात बोलताना पंढरपूरसाठी आनंदाची घोषणा केली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र व देवस्थान विकासासाठी 2700 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा केली. हा आराखडा मंजूर करण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्री विशिष्ट बैठका घेतील.आराखड्याच्या तीन डिजाईन तयार आहेत, त्यामधून एक डिजाईन मंजूर होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. या बैठकीत पंढरपूर येथील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन काम सुरू होईल असे, देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून घोषणा केली.
पंढरपूरसाठी 2700 कोटींचा आराखडा:पंढरपूर हे दक्षिण भारतातील काशीपीठ आहे. देशभरातील लाखो भाविकांच श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेचे पंढरपूर हे दैवत आहे. या राज्य सरकारने विठ्ठल मंदिरातील आतल्या भागातील विकासासाठी 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.पंढरपूर तीर्थक्षेत्रसाठी एकूण 27 00 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 2700 कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा आराखडा असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून सांगितले.