महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2020, 1:56 AM IST

ETV Bharat / state

पंढरपुरात दूध डेअरी चालकाला सव्वा दोन लाखाचा दंड; दूधात केमिकलचा वापर

फॅट वाढविण्यासाठी दूधात विविध पदार्थ टाकल्या प्रकरणी डेअरीवर चालकावर 2 लाख 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही करवाई अन्न आणि औषध विभागाच्या वतीने करण्यात आली.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

पंढरपूर- तालुक्यातील शेटफळ येथे फॅट वाढविण्यासाठी दूधात विविध पदार्थ टाकल्या प्रकरणी शाम डेअरीवर 2 लाख 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही करवाई अन्न आणि औषध विभागाच्या वतीने करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या महितीनुसार, शेटफळ गावातील शाम डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणवर दूध भेसळयुक्त पदार्थ विकले जात असल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी शाम केंद्र चालकाने दुधात भेसळ करण्यासाठी व्हे परमिट पावडर ९८ किलो, लॅक्टोज पावडर ९८ किलो आणि १५ किलो गोडेतेलाचा डबा साठा करून ठेवल्याचे आढळले. दूध डेअरी चालक शहाजी साबळे (रा. साबळे वस्ती, शेटफळ, ता. पंढरपूर) यास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी २ लाख २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. या कारवाईची सुनावनी अन्न व औषध प्रशासनासमोर झाली. तिन्ही प्रकरणात डेअरी चालक साबळे यास दोषी मानून प्रत्येकी ७५ हजार रूपयाचा दंड केला.

ABOUT THE AUTHOR

...view details