पंढरपूर नगरपरिषदेला 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार' - swach bharat abhiyan
स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर नगरपरिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नगरविकास राज्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
सोलापूर - पंढरपूर नगरपरिषदेला केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात 17 वा क्रमांक मिळाला. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेला मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार 2019 च्या सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवरील नॉन अमृत (अटल मिशन फॅार रिज्यूवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॅारमेशन) विभागामध्ये पंढरपूर नगरपरिषदेचा 17 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नगरविकास राज्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.