महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात प्रशासनाची धडक कारवाई, मास्क न वापरणाऱ्यांना दंड - पंढरपूर पोलीस मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारपासून जिल्ह्यात नियम अधिक कडक करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियम मोडण्याऱ्या, अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मास्क न वापरणे, हेल्मेट न घालणे, डबल, ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध दंड वसूल करण्यात आला.

Pandharpur police news
पंढरपुरात प्रशासनाची धडक कारवाई, मास्क न वापरणाऱ्यांना दंड

By

Published : Jul 7, 2020, 7:18 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर शहर आणि आसपास परिसरातून येणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पंढरपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर गेली आहे. सोमवारी पंढरीत पाच कोरोना रुग्णाची भर पडली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारपासून जिल्ह्यात नियम अधिक कडक करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियम मोडण्याऱ्या, अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मास्क न वापरणे, हेल्मेट न घालणे, डबल, ट्रिपल सीट दुचाकी चालविनाऱ्यांविरुद्ध दंड वसूल करण्यात आला. शहरातील प्रदक्षिणा मार्गावर, नवी पेठ, जुनी पेठ, लिंक रोड, गणेश नगर, भक्ती मार्ग, कराड नाका, करकंब गाव भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

पंढरीत सद्या 22 जणांवर उपचार सुरू असून सात कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पंढरीतील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर गेली आहे. कोरोनाबाधित रुग्णाना वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. रुग्णच्या संपर्कतील नागरिकांचा शोध प्रशासन घेत आहे. पंढरीत 71 जणाचे अहवाल अजून प्रलंबित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details