महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरच्या सचिनने साकरलेले दिव्य कासवाचे शिल्प मुंबईतील प्रदर्शनात झळकणार

सोलापुरातील सचिन खरात हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा चित्रकार आहे. त्यांनी साकारलेल्या दिव्य कासवाच्या शिल्पाचे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन होणार आहेत.

चित्रकार सचिन खरात

By

Published : Sep 6, 2019, 6:57 PM IST

सोलापूर- सचिन खरात या सोलापुरातील युवा चित्रकाराने साकारलेल्या दिव्य कासवाच्या शिल्पाचे मुंबईत प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 'पद्म स्पर्श' हे प्रदर्शन पार पडणार आहे. 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये हे प्रदर्शन पार पडणार आहे.

सोलापूरच्या सचिनने साकरलेले शिल्प दिव्य कासवाचे

हेही वाचा -उद्धव ठाकरे गुळाला मुंगळा चिकटून बसल्यासारखे सत्तेला चिटकलेत, खासदार अमोल कोल्हे यांची टीका

सोलापुरातील सचिन खरात हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा चित्रकार आहे. त्यांनी आतापर्यंत देशविदेशातील आगळ्यावेगळ्या चित्र आणि शिल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. त्यांनी काढलेली विविध रंगसंगती तसेच विविध रूपातील चित्रे आणि शिल्पांनी अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. शिवाय हौशी प्रेक्षकांनी लाखो रुपयांमध्ये ती खरेदीसुद्धा केलेली आहेत. मात्र आता चित्रकार सचिन खरात यांनी "दिव्य कासवा"चे (कुर्म) शिल्प साकारले आहेत. दोन फूट उंच आणि साडेचार फुट गोलाई असलेल्या विष्णू अवतारातील हे शिल्प आहे. या दिव्य कासवाच्या शिल्पासह २० हुन अधिक निवडक चित्रांचे प्रदर्शन "पद्म स्पर्श" या नावाने मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
सचिन खरात यांनी आतापर्यंत कामधेनू, बुद्ध, बुद्धांचा चेहरा आदी ५ ते ७ फुटापर्यंत शिल्पे तयार केली आहेत. शिवाय हनुमान, विष्णू, शंकर, पार्वती, यशोधरा आदी चित्रेसुद्धा साकारली आहेत. मात्र आता तयार केलेले कासवाचे शिल्प अगदी वेगळे आहे. माती, पीओपी, रबर सोल्युशन आणि त्यानंतर अंतिमतः फायबरमधून साकारण्यात आलेले ऑइल व ऍक्रेलिक रंगातील ३० ते ३५ किलो वजनाचे कासव शिल्प पाहताच क्षणी डोळ्यात भरते. कासव शिल्पाच्या पाठीवर विष्णू, नंदी, गजराज, महावीर, राधा, काली, लक्ष्मी, सखी यासह भूतलावरील देवदेवता तसेच मानव व दानव चित्रे साकारण्यात आली आहेत. हे शिल्प साकारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. भारतात अशा प्रकारचे शिल्प अद्याप कोणत्याही कलावंताने साकारले नाही असा चित्रकार खरात यांचा दावा आहे.

सचिन खरात यांची आतापर्यंत दुबईत ५, लंडन १, दक्षिण आफ्रिका ४, सिंगापूर ४, इंडोनेशिया ३, जकार्ता १ आणि बाली येथे ३ अशी प्रदर्शने झाली आहेत. भारतात तर शंभरावर अधिक प्रदर्शने झाली आहेत. या प्रदर्शातील चित्रे आणि शिल्पांना मोठी मागणीसुद्धा राहतात. देश विदेशातील हौशी मंडळींकडून चित्र व शिल्पांची खरेदीसुद्धा करण्यात आली आहे. खरात यांना कॅम्लिन नॅशनल अवॉर्ड, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड मिळाले आहेत. याशिवाय अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सचिन हे प्रथम गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहेत. भारतात जे काही ट्रेडिशनल आर्टिस्ट आहेत त्यामध्ये सोलापूरच्या सचिन खरात यांचे नाव घेतले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details