सोलापूर - दिवसेंदिवस सोलापुरातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पी. सिवा शंकर यांची सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, पी. सिवा शंकर यांची नियुक्ती - solapur Municipal new Commissioner
सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पी. सिवा शंकर यांची सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
सोलापुरात कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी सकाळी कोरोनाबाधितांची संख्या ही 800 च्या वर गेली आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा सर्वाधिक 9 टक्के झालेला आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पी. सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिवा शंकर हे मागील 1 महिन्यापासून सोलापूर शहरात आहेत. अतिरिक्त अधिकारी म्हणून त्यांना सोलापुरात पाठवण्यात आले होते. मात्र, आता त्यांची कायमस्वरूपी महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. दिपक तावरे यांना वखार महामंडळचे कार्यकारी संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे.