महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : देश-विदेशातील 6 हजार धावपटूंचा सहभाग - Solapur latest news

या स्पर्धेच्या पुरुष गटात केनियाच्या एल्युड कमारु मथाई आणि महिला गटात एलिस कमुन्या यांनी यशस्वी धाव घेतली. दोघांनी 21 किमी गटात आपल्या सर्वोच्च वेळेची नोंद केली.

International Marathon in Solapur
सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

By

Published : Jan 5, 2020, 12:08 PM IST

सोलापूर- शहरात सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह जवळपास 6 हजार सोलापूरकर धावपटूंनी सहभाग नोंदवला. गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या सोलापूर मॅरेथॉनला यंदाच्या तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे.

देश-विदेशातील 6 हजार धावपटूंचा सहभाग

हेही वाचा - करमाळ्याची केळी सातासमुद्रापार; पारंपरिक शेतीला फाटा

या स्पर्धेच्या पुरुष गटात केनियाच्या एल्युड कमारु मथाई आणि महिला गटात एलिस कमुन्या यांनी यशस्वी धाव घेतली. दोघांनी 21 किमी गटात आपल्या सर्वोच्च वेळेची नोंद केली. या फन रनला हरिभाई देवकरण प्रशालेपासून सुरुवात झाली. अर्ध मॅरेथॉन डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, शासकीय दूध डेअरी, संभाजी तलाव, आयटीआय, भारती विद्यापीठ, डी मार्ट, टाकळीकर मंगल कार्यालय मार्गे विजापूर रोडकडून सैफूल, एसआरपी कॅम्पच्या पुढे जावून पुन्हा त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशाला येथे संपली.

हेही वाचा - यशस्वी शेतकरी सतीश झोळ यांची केळी पोहचली सातासमुद्रापार

तर 10 किमीसाठी हरिभाई देवकरण प्रशालेपासून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, शासकीय दूध डेअरी, संभाजी तलाव, आयटीआय, भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय पासून पुन्हा त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशालेजवळ समारोप झाला.

तर साडेतीन किलोमीटरची फन रन हरिभाई देवकरण प्रशालेपासून सुरूवात होऊन डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशाला येथे संपली. आज पहाटेपासून या मार्गावरील जड वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. त्यामुळं संपूर्ण सोलापूर शहर आज मॅरेथॉनमय झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details