महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : माढ्याचा केशर आंबा सातासमुद्रापार.. रसदार व चविष्ट आंब्यांची युरोपकरांना भूरळ - केशर आंबा

रसदार व चवदार अशा या आंब्याची चव युरोपकरांना चांगलीच आवडलीय. युरोपकरांचे तसे फोन देखील महेशला आवर्जुन येत आहेत. १ टन आंबा युरोपला नुकताच रवाना झाला असून लवकरच आम्ही दुसरी ट्रक घेऊन येत असल्याचा निरोप देखील महेश यांना तेथील बाजारपेठेतून आलाय.

-keshar-mango-shipped-to-europe
-keshar-mango-shipped-to-europe

By

Published : Apr 28, 2021, 5:52 PM IST

माढा (सोलापूर) - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या गुणवत्तापूर्ण मालाला विदेशात पोहोचायला काहीच वेळ लागत नाही. माढा तालुक्यातील निमगाव(मा) गावच्या महेश मदन मुकणे या तरुणाने बंधु अमोल मुकणेच्या मदतीने सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेला केशर आंबा युरोपला जाऊन पोहचलाय. रसदार व चवदार अशा या आंब्याची चव युरोपकरांना चांगलीच आवडलीय. युरोपकरांचे तसे फोन देखील महेशला आवर्जुन येत आहेत. १ टन आंबा युरोपला नुकताच रवाना झाला असून लवकरच आम्ही दुसरी ट्रक घेऊन येत असल्याचा निरोप देखील महेश यांना तेथील बाजारपेठेतून आलाय.

माढ्याचा केशर आंबा सातासमुद्रापार
सीना नदीच्या काठी बहुतांश शेतकरी ऊस शेती करतात. मात्र महेशने चार एकर क्षेत्रात केशर आंब्यांची बाग विकसित केलीय. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता महेशने शेतातील पारंपारिक पिके घेण्याचे बंद करुन ४ एकर क्षेत्रात केशर आंब्यांची १७०० झाडे लावलीत. यापैकी यंदा १०० झाडाचे उत्पन्न हाती आले असून यातून त्यांना ४ ते ५ लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. युरोपला गेलेला १ टन आंबा प्रति किलो १६० रुपये दराने विकला गेलाय. तर महेश यांना बंधु अमोल व अमित यांचे पाठबळ मिळत आले आहे.

माढ्यासह परिसरातील गावातील नागरिकांना देखील महेश हा आंबे थेट घरपोहोच करतोय. मागील ८ दिवसात ५०० ते ७०० किलोच्या आंब्याची विक्री झालीय. तर आणखी चार टन आंब्याचे उत्पन्न निघण्याचा विश्वास महेशला वाटतो आहे. बीएससी अ‌ॅग्रीचे शिक्षण घेतलेला महेशने नोकरीच्या वाटा शोधत न बसता केशर आंब्याची लागवड केल तो प्रयोग यशस्वी देखील झालाय. योग्य नियोजनामुळे महेशचा आंबा विदेशात जाऊन पोहचलाय. केशर आंबा लागवडीचा प्रयोग महेशला फायदेशीर अन् लखपती बनवणारा ठरला गेलाय. प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची परिसरात ओळख बनली गेलीय.

संगोपनाचा खर्च दीड ते २ लाख-

चार एकर क्षेत्रात १७०० केशर आंब्याच्या झाडाची लागवड केली असून याकरिता वर्षात दीड ते दोन लाख खर्च येतो. त्यापैकी यंदाच्या वर्षी १०० झाडांना आंबे लागलेत. यामधून ४ ते ५ लाख रुपये मिळतील, असा विश्वास महेश यांना वाटतोय.

..असे केले संगोपन अन् पाण्याचे नियोजन-


केशर आंब्यांच्या लागवडीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी आणि खत. एक बोअर आणि सीना नदीवरुन आणलेली पाईपलाईन द्वारे ठिबक सिंचन द्वारे दररोज चार तास पाणी आमराईला दिले जाते. तसेच जिवामृत टाकीची उभारणी करुन गोमुत्र शेणखत मिक्स करुन दर ४ दिवसाला आंब्याला सोडले जाते. हा जैविक सेंद्रिय आंबा चवदार लागतो.

ऊसशेतीला पर्याय आंबा -

सीना नदी काठावरील गाव असल्याने बहुतांश शेतकरी ऊस शेतीची लागवड करत आलेत. मात्र शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते हे तंत्र ध्यानी घेतले. त्यानुसार आंब्याची बाग विकसित केली आणि यशस्वी देखील झालीय. आपल्या शेतातला अन् ग्रामीण भागातील आंबा परदेशात जाऊन पोहचतो. यापेक्षा मोठा कोणताच आनंद असूच शकत नाही. आणखी ४ एकर बाग वाढविण्याचे नियोजन मी आखत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details