सोलापूर - तूळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळेगाव व 3 किमीचा परिसर सील करण्याची कारवाई सुरू आहे. उळे गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना प्रशासनाने ताब्यात घेऊन पुढील तपासणी व उपचारांसाठी नेले आहे.
सोलापूर : उळे गावात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण, पंचक्रोशी करणार सील - solapur corona latest news
उळे येथील रहिवासी असलेला एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. खबरदारी म्हणून त्याच्या कुटूंबातील 9 जणांना ताब्यात घेतले असून त्या सर्वांना टाकळी येथील अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. पोलीस प्रशासनाने उळे गावात जाऊन गाव व परिसरातील 3 किमीचा परिसर सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
सोलापूरातील एका मोठ्या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. उळे येथील रहिवासी असलेली ही व्यक्ती दररोज सोलापूर ते उळे ये-जा करत होती. सोलापूरातील त्या रुग्णालयात काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच उळे येथील हा कर्मचारीदेखील कोरोनाबाधित निघाला. सध्या त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. कुटुंबातील 9 जणांना ताब्यात घेतले असून त्या सर्वांना टाकळी येथील अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. पोलीस प्रशासनाने उळेगावात जाऊन गाव व परिसरातील 3 किमीचा परिसर सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. सोलापूरातील शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण ठेवण्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे यापुढील रुग्ण हे सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या कूंभारी येथील खाजगी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.