महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात ट्रॅक्टर-ट्रकची जोरदार धडक, अपघातात एकजण ठार... - ropale road accident

कुर्डुवाडीहून पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने पहाटे उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. बंडु दौलतराव घाडगे असे मृताचे नाव आहे.

truck and tractor accident
कुर्डूवाडी पंढरपूर रोड अपघात

By

Published : Nov 1, 2020, 4:54 PM IST

Updated : Nov 1, 2020, 5:37 PM IST

पंढरपूर - कुर्डुवाडीहून पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने पहाटे उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. बंडु दौलतराव घाडगे असे मृताचे नाव आहे.

ट्रक आणि ट्रॅक्टरची धडक

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. अपघातातील दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होते. हा ट्रॅक्टर पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील असल्याचे समजते. या भीषण अपघातामध्ये ट्रक व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच ट्रकमधील एक व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर लाईफलाइन रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

Last Updated : Nov 1, 2020, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details