सोलापूर - शहरात 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इंदिरानगर भागात राहणारी ही महिला कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यूमूखी पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी; 69 वर्षीय महिलेचा मृत्यू, 13 जणांवर उपचार सुरू - कोरोना इफेक्ट
सोलापूर शहरात कोरोनामुळे आता हा दूसरा मृत्यू आहे. मागील रविवारी एका 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आता 69 वर्षीय महिला ही कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यूमूखी पडली आहे.
सोलापूर शहरात कोरोनामुळे आता हा दूसरा मृत्यू आहे. मागील रविवारी एका 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आता 69 वर्षीय महिला ही कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यूमूखी पडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती हे ज्येष्ठ नागरिक होते. मृत्यू झालेली महिला ही इंदिरा नगर भागात राहायला असल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे. या भागातून कोणालाही बाहेर पडण्यास तसेच या भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मृत झालेल्या महिलेच्या संपर्कात असलेल्या 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे नमूने घेऊन तपासणी करण्यात आली आहे.