महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू - दुचाकीस्वार

अपघातात निजाम नदाफ (वय ६५, राहणार भारतमाता नगर, मजरेवाडी सोलापूर) हे जागीच ठार झाले आहेत.

अपघात

By

Published : Jul 19, 2019, 12:37 PM IST

सोलापूर -अवैध वाळू उपसा करुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे घडली आहे.

अपघातात निजाम नदाफ (वय ६५, राहणार भारतमाता नगर, मजरेवाडी सोलापूर) हे जागीच ठार झाले आहेत. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एमएच-१२ डीटी ००६५ क्रमांकाची ट्रक अवैध वाळू घेऊन सोलापूरकडे जात होती. यादरम्यान समोरुन येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार नदाफ ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

तडवळ भागात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन अवैध वाळू वाहतुकीवर बघ्याची भूमिका घेताना पाठबळ दिले आहे. त्यामुळे, प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details