सोलापूर- भरधाव टिपरने धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या या आय. जे. कांबळे या निवृत्त कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील होटगी रोड वर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सोलापूर शहरातील होटगी रोड हा महत्वाचा आणि जास्त वाहतूक असलेला रस्ता आहे. या रस्त्यावर आसरा चौकाजवळ दुपारच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या टिपरने एका दुचाकीला जोरात उडविले. या अपघातामध्ये दुचाकीवरील कांबळे हे जागीच ठार झाले आहेत.