महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात नेत्रशस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णाचा मृत्यू, डॉ. तात्याराव लहाने करत होते शस्त्रक्रिया - eye treatment medical camp solapur

माढ्यात माढेश्वरी अर्बन बँकेच्यावतीने दोन दिवसांपूर्वी नेत्ररोग चिकित्सा आणि शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात माढा येथील नामदेव दामू नेटके (वय - 60) हे वृद्ध नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी सहभागी झाले होते. त्यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना भूल देण्यात आली.

dead man
मृत नामदेव दामू नेटके

By

Published : Feb 9, 2020, 7:57 AM IST

सोलापूर -प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिबिरात नेत्रशस्त्रक्रिया झालेल्या एका शिबिरार्थी रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या भूलीच्या अतिरिक्त डोसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. नामदेव दामू नेटके (वय - 60) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आपल्याला न्याय मिळाल्याखेरीज मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.

सोलापुरात डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिबिरातील रुग्णाचा मृत्यू

माढ्यात माढेश्वरी अर्बन बँकेच्यावतीने दोन दिवसांपूर्वी नेत्ररोग चिकित्सा आणि शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात माढा येथील नामदेव नेटके हे वृद्ध नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी सहभागी झाले होते. त्यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना भूल देण्यात आली. त्यानंतर नेटके यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यात नामदेव नेटके यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

घटनेनंतर नातेवाईकांनी सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, म्हणून सोलापूर शासकीय रूग्णालयात सदर बझार पोलीस अंकित चौकीत अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास नकार देण्यात आला. तसेच मृत नेटके यांचे शवविच्छेदन न करता मृतदेह हलविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला आणि त्यांनी न्यायाच्या मागणीसाठी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details