सोलापूर -मध्यरेल्वे सोलापूर डिव्हिजनमधील रेल्वे स्थानक प्रमुखांच्या संघटनेच्यावतीने डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्यावा-
कोरोना महामारीच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नाही. दिवस रात्र रेल्वे कर्मचारी प्रवाशांना सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. अनेक रेल्वे कर्मचारी थेट प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची लागण होत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना आरोग्यविमा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संजय अर्धापुरे यांची प्रतिक्रिया रद्द करण्यात आलेला रात्र भत्ता मिळावा- गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्र भत्ता मिळत होता. पण गेल्या महिन्यात शासनाने परिपत्रक काढून रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळत असलेला रात्र भत्ता बंद केला. हा भत्ता किंवा नाईट सिलिंग ड्युटी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच 2017पासून ज्यांनी रात्र भत्ता घेतला आहे, तो देखील वेतनातून वजा केला जाणार असल्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा- यशवंतराव चव्हाण स्मृतीदिन; कराडच्या प्रितिसंगमावर मान्यवरांची आदरांजली, शरद पवारांची अनुपस्थिती