पंढरपूर (सोलापूर) -जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वारीच्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी कालावधीत नागरिकांनी व भाविकांना कळसाचे दर्शन, नामदेव पायरी दर्शन घेण्यासाठी तसेच नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे, आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे.
एका दिवसाची असेल संचारबंदी
शहरात भाविकांची तसेच परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी 22 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजल्या पासून ते 23 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत (मंगळवारी पूर्ण दिवस) पंढरपूर शहर व शहरालगतच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्याने मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच मंदीर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन पार पाडावेत. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्या, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी जाधव यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आषाढी, कार्तिकीप्रमाणे माघी वारीतही सहकार्य करावे