सोलापूर - सोलापूरमध्ये विजापूर नाका पोलिसांनी सोलापूर विजापूर महामार्गावर सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याने गांजा विकणाऱ्या तस्करीचे धाबे दणाणले आहेत. विजापूर नाका पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयास्पद जाणाऱ्या इनोव्हा कारला अडवून झडती घेतली असता त्यामध्ये गांजा (Cannabis Bijapur Highway) आढळून आला आहे. या कारवाईमध्ये 4 संशयित आरोपी पळून गेले आहेत. (Solapur Bijapur Highway Police) मात्र, सोलापूर ग्रामीण भागातील एका संशयित आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सव्वा कोटींचा गांजा आणि इनोव्हा कार असा एकूण 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गस्त करत असलेल्या अवघ्या तीन पोलिसांनी मोठा गांजा साठा जप्त केल्याने या पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल हे या तिन्ही पोलिसांना रिवार्ड देण्याची देखील घोषणा केली आहे.
सोलापूर विजापूर महामार्गावर सिनेस्टाईल कारवाई-
सोलापूर विजापूर महामार्गावर सैफुल पोलीस चौकीचे पीएसआय सुरज मुलाणी, अमृत सुरवसे, प्रकाश राठोड हे रात्री गस्त करत होते. त्यावेळी सोलापूर शहरातून दोन संशयास्पद कार भरधाव वेगाने जात होत्या. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना याबाबत संशय आला. त्यांनी दोन्ही कार अडवण्याचा प्रयत्न केला. पण टवेरा, इनोव्हा कार थांबल्या नाहीत. तिन्ही पोलिसांनी दोन्ही कारचा पाठलाग सुरू केला. विजापूर रोडवरील इंचगिरी मठाजवळ इनोव्हा कारला पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, तवेरा कार निसटली.
त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती होती
इनोव्हा कार क्रमांक (एम.एच 04 डी जे 3715)यामध्ये दोघे बसले होते. पोलिसांना पाहून इनोव्हा मधील एक संशयित इसम रात्रीच्या अंधारात पळून गेला. तर एक संशयित इसम सुखदेव यशवंत राठोड(वय 27,रा, तेरा मैल, दक्षिण सोलापूर)याला पोलिसांनी पकडले आणि कारची झडती घेतली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती होती. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचं समजल.पेट्रोलिंगच्या पोलिसांनी ताबडतोब इनोव्हा कार गांजा सहित आणि संशयित इसमा सहित विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणली आणि तपास सुरू केला. सिनेस्टाईल पाठलाग करून 623 किलो गांजा, एक इनोव्हा कार आणि एक संशयित इसम ताब्यात घेतला. मात्र एक ट्वेरा आणि चार संशयित इसम पळून गेले.
हैदराबाद येथून गांजा आणला असल्याची प्राथमिक माहिती समोर-