सोलापूर - दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक अपघात आठवण दिवस ( World Accident Remembrance Day ) म्हणून साजरा केला जातो. याबाबत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ( Solapur Sub Regional Transport Office ) सोलापुरातील सात रस्ता, मार्केट यार्ड, बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर करून अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मृत्यूचा तांडव कसा होतो,याबाबत जनजागृती केली.
World Accident Remembrance Day : जागतिक अपघात दिनानिमित्त पथनाट्य सादर, आरटीओ कार्यालयाने केली जनजागृती - World Accident Remembrance Day
सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ( Solapur Sub Regional Transport Office ) सोलापुरातील सात रस्ता, मार्केट यार्ड, बसस्थानक परिसरात जागतिक अपघात आठवण दिवस ( World Accident Remembrance Day ) साजरा केला.
पथनाट्य सादर -पथनाट्य सादर करून वाहनधारकांना जागृत करून, वाहतूक नियमांचे धडे दिले.अपघात झाल्यानंतर अनेक नागरिक मदत करण्याऐवजी सेल्फी काढत असतात असे न करता,अपघातातील जखमींना ताबडतोब ररुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे. अशी महिती, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणंकर यांनी दिली. तसेच वाहन निरीक्षक शीतल कुमार कुंभार यांनी देखील माहिती देताना सांगितले की,आपला जीव हा ,अनमोल आहे वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन केले आहे.
आरटीओ कार्यालयाची जनजागृती -सोलापुरातील सात रस्ता,मार्केट यार्ड परिसर,बस स्थानक परिसरात आरटीओ कार्यालयाने मुख्य चौकात पथनाट्य सादर केले.अपघातात जसे मृत्यू होतात त्या प्रकारे सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली.अपघात झाल्यानंतर,दुःख व्यक्त करत न बसता,ताबडतोब अंब्युलन्स(रुग्णवाहिकेला)बोलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याची माहिती पथनाट्यमधून देण्यात आली.