पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच संपूर्ण मंदिरात हजारो पणत्या लावण्यात आल्या. दीपोत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर पणत्यांच्या दीपोत्सवात उजळून निघाले होते.
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरीत विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते.
पणत्यांच्या दीपोत्सवात उजळले विठ्ठल मंदिर हेही वाचा -ईटीव्ही भारत स्पेशल;- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील 'बारा भानगडी'
विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संपूर्ण मंदिरात पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांबी मंडप, नामदेव पायरी, उत्तर-दक्षिण द्वारात हजारो पणत्यांनी दीपोत्सव उजळून निघाला होता. मंदिरामध्ये रांगोळी काढण्यात आली होती.
हेही वाचा -गुरुनानक जयंती निमित्त देओल परिवाराने केली 'अपने २' ची घोषणा
28 नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुखदर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून मुखदर्शनाची संख्या दोन हजारावरून तीन हजार करण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.