महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! वृद्ध कोरोनाबाधिताचा क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास; कारण अस्पष्ट

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने यावृद्धाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना सौम्य लक्षणे होती. कुटुंबीयांनी दगडू अंकुश यांना सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथील सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने रविवारी रात्री घरातून डबादेखील आणून दिला होता. रविवारी रात्री जेवण करून सर्व रुग्ण झोपल्यानंतर त्यांनी बाथरूममध्ये जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

old corona patient suicide in quarantine centre solapur
वृद्ध कोरोनाबाधिताचा क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास

By

Published : Oct 20, 2020, 2:15 AM IST

सोलापूर -येथील सोलापूर-पुणे महामार्गावरील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका वृद्ध रुग्णाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. केगाव येथील सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली.

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने यावृद्धाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना सौम्य लक्षणे होती. कुटुंबीयांनी दगडू अंकुश यांना सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथील सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने रविवारी रात्री घरातून डबादेखील आणून दिला होता. रविवारी रात्री जेवण करून सर्व रुग्ण झोपल्यानंतर त्यांनी बाथरूममध्ये जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

सोमवारी सकाळी त्यांचा शोध घेतला असता ते क्वारंटाईन सेंटरमध्ये दिसून आले नाही. बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता. इतर रुग्णांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. डॉक्टरांनी सावधानता बाळगत क्वारंटाईन सेंटरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.

माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासून मयत झाले असल्याची माहिती दिली. तसेच कुटुंबीयांनाहही कळविले. मृतदेह क्वारंटाईन सेंटरमधून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. तर सोमवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान, या वृद्धाने कोणत्या कारणाने गळफास घेतला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details