महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

DCM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृतासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका ; फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी (puja of Vitthal Rukmini on Kartiki Ekadashi) आज पंढरपूर येथे सपत्नीक दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली.

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृतासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका

By

Published : Nov 4, 2022, 1:08 PM IST

पंढरपूर :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी (puja of Vitthal Rukmini on Kartiki Ekadashi) आज पंढरपूर येथे सपत्नीक दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे शासकीय महापूजा संपन्न होत असते. त्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे पंढरपूर मध्ये पाच वाजले सुमारास आगमन (grand puja of Vitthal Rukmini by DCM with wife) झाले.

उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृतासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका

टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर :पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असताना फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकावून वारकऱ्यांना साथ दिली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी हरिनामाचा जयघोष केला. या स्वागतावेळी उपस्थित असणाऱ्या वारकऱ्यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी फुगडीचा फेरही धरला. अमृता फडणवीस यांनी डोक्यावरती तुळस घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर (puja of Vitthal Rukmini on Kartiki Ekadashi) धरला.

माऊली तुकाराम जयघोषावर ठेका :यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका धरून रंगत आणली. ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असताना फडणवीस यांनी गळ्यात टाळ अडकावून वारकऱ्यांना साथ दिली. तर श्रीमती फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात फेर धरला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित (Kartiki Ekadashi) होते.

ABOUT THE AUTHOR

...view details