महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आकर्षक आरास - shri-vitthal-rukmini temple pandharpur latest news

अंगारकी चतुर्थी निमित्त दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती दुर्वांची मनमोहक सजावट करण्यात येत. यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये दुर्वांसह गुलाब व मोदक आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आरास
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आरास

By

Published : Mar 2, 2021, 1:50 PM IST

Updated : Mar 2, 2021, 5:42 PM IST

पंढरपूर-अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात दुर्वा ( हराळीची) आरास करण्यात आली आहे. श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने ही आरास करण्यात आली आहे. दुर्वांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनी केली आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आरास

दरवर्षी करण्यात येते आरास

अंगारकी चतुर्थी निमित्त दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती दुर्वांची मनमोहक सजावट करण्यात येत. यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये दुर्वांसह गुलाब व मोदक आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच सजावटीतून अष्टविनायक गणपतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आले. विठ्ठल-रखुमाईचे रुप डोळ्यांत साठवून घेऊयात असे वाटते.

अंगारकी चतुर्थी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आरास
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन सुरूवैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दसऱ्याच्या मुहूर्तावर मुखदर्शन मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आले होते. तसेच कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे. मंदिरामध्ये प्रवेश देताना भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ६५ वर्ष व यावरील व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश बंदी आहे.
Last Updated : Mar 2, 2021, 5:42 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details