सोलापूर - कोविड काळात कंत्राटी म्हणून कार्य केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून ( NRHM Salary issue ) पगारी नाहीत. फक्त आश्वासने मिळत आहेत. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा अनेक व्यथा सांगत जिल्ह्यातील एनआरएचएम अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी ( NRHM employees agitation in Solapur ) कार्यालयात गोंधळ सुरू केला.
सोलापूर जिल्ह्यात कोविड महामारी काळात सफाई कर्मचारी ते डॉक्टरांच्या कंत्राटी पदावर नियुक्त्या ( Contract basis appointment in NRHM ) केल्या होत्या. या नियुक्त्या एनआरएचएम अंतर्गत तीन महिन्यांसाठी केल्या होत्या. आरोग्य प्रशासनाने वेळोवेळी त्यांची सेवा वाढविली. सुरुवातीला दोन ते तीन महिने नियमित वेतन झाले. त्यानंतर या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी रखडल्या ( NRHM Employees Salary issue in Solapur ) आहेत. आरोग्य खात्यात कंत्राटी म्हणून लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हील सर्जन व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत पगाराची मागणी केली होती. पण वर्षभरापासून यांच्या मागण्या रखडल्या होत्या.
पगारी का रखडल्या याचे कारण शोधणे गरजेचे-
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या एनआरएचएम अंतर्गत झाल्या होत्या. गेल्या वर्षीभरापासून एनआरएचएम चर्चेत आहे. कंत्राटी म्हणून नियुक्त असलेल्या जिल्हा लेखापरीक्षकांच्या कामकाजावरदेखील अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती झालेल्या या कर्मचाऱ्यांच्या पगारी का रखडल्या, याचा सखोल तपास करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.