महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार

शासनाने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. यामुळे 10 टक्के कर्मचारी 6 व्या वेतनावरच सेवानिवृत्त झाले. प्राध्यापकांना सातवा वेतन लागू करण्यात आला असून विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांना लागू केला नाही, असा भेदभाव केला जात आहे. यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.

non teaching staff of punyshlok ahilyadevi holkar solapur university boycotts university exams for seventh pay
सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार

By

Published : Sep 7, 2020, 10:05 PM IST

सोलापूर - आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती दिली. यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन काशीद व सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियन अध्यक्ष राजेंद्र गोटे यांनी माहिती सांगितली.

राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना व प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, परंतु विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग लागू केला नाही. तर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना अर्धवट लागू केले आहे. दोन्ही संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली, परंतु शासनाने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. यामुळे 10 टक्के कर्मचारी 6 व्या वेतनावरच सेवानिवृत्त झाले. प्राध्यापकांना सातवा वेतन लागू करण्यात आला असून विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांना लागू केला नाही, असा भेदभाव केला जात आहे. यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अनेक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

शासनाने तात्काळ यंदाच्या अधिवेशनात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा येणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षांवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. या पत्रकार परिषदेत राजेंद्र गिड्डे, दत्ता भोसले, अजितकुमार सांगवे, सोमनाथ सोनकांबळे, रविराज शिंदे, रविकांत हुक्केरी, मलिक रोकडे, मलकासिद्ध हैनाळकर,वसंतराव सपथाळे आदी उपस्थित होते.


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या -

1)विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा

2)अश्वासित प्रगती योजना लागू करावी

3)पाच दिवसांचा आठवडा लागू करावा

ABOUT THE AUTHOR

...view details