सोलापूर - राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केलेले आहे. असे असताना एकीकडे मात्र जुलै महिना उलटूनही सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी अजूनही कोरडीच आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख जलस्त्रोत असलेल्या सीना नदी खोऱ्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पावसाची आस पावसाळ्याचे जून आणि जुलै हे दोन महिने गेले मात्र पाऊसच न झाल्यामुळे संपूर्ण नदीपात्र आजही कोरडेच आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामांसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पाण्याची वर्षभर निकड भासत असते. यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस व्हावा, पाण्याची पातळी वाढावी म्हणून वरुणराजाकडे साकडे घालण्यात घातले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पावसाची आस गेल्या दोन-तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातही हवा तितका पाऊस झालेला नाही. सीना नदी ही कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्याने त्या पेरणीला पावसाची अत्यंत गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंकलगी बंधारा वाहून गेल्यामुळे संजवाड, औराद, बोळकवठा, राजूर ह्यासह अन्य गावांतील शेतकरी हे पावसाची वाट पाहत आहेत.
दोन ते तीन वर्षापासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षीही पाऊस नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे