सोलापूर - जन्म कुठे घ्यावा आणि कुणाच्या घरात घ्वावा हे जस आपल्या हातात नाही. तसेच, शारीरिक अवयवांतही जन्मत: काय अडचणी असतील किंवा काय त्रास आपल्या वाट्याला येईल हेही आपल्या हातात नाही. मात्र, आपल्याला हे नाही म्हणून खचून जाण्यात आणि त्या गोष्टीला सतत डोक्यात घेऊन चिंताग्रस्त राहण्यापेक्षा आपल्याला जे निसर्गाने दिले आहे, त्याच्या जोरावर नवी स्वप्ने पाहणे जास्त महत्वाचे आणि प्रेरणादायी आहे. अशीच परिस्थितीशी हिम्मत ठेऊन लढणारी सोलापूर येथील लक्ष्मी शिंदे या मुलीशी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
पायांनी राखी बांधत आहे हा क्षण डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा
लक्ष्मीला जन्मत: दोन्ही हात नाहीत. मात्र, आपल्याला हात नाहीत याची कसलीच खंत किंवा उनिव लक्ष्मीला जानवली नाही. किंबहून आपल्याला हात नाहीत याकडे लक्ष्मीने कधीच लक्ष दिले नाही. आपल्या हातामध्ये कोणतेही काम करण्याची जी सहजता असते तीतकी किंबहूना जास्त सहजता लक्ष्मीच्या पायात आहे. लक्ष्मी प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या दोन्ही भावांना राखी बांधते. यावर्षीही तिने आपल्या भावांना पायाने कुंकु टीळा लावत राखी बांधली आहे. लक्ष्मी आपल्या पायांनी राखी बांधत आहे, हा क्षण गहिवरून टाकणारा आहे. बहिण भावाच्या नात्यातील बंध किती अतुट असतात हे दाखवणारा आहे. त्याचवेळी आपल्याला हात नाहीत. आपण आपल्या भावाला हाताने राखी बांधू शकत नाही याची कसलीच खंत लक्ष्मीच्या बोलण्यात नाही ना चेहऱ्यावर नाही. निसर्गाने तिला हात दिले नसले, तरी पायांमध्ये हातासारखी ताकद दिली असल्याचे तिच्या प्रत्येक शब्दात, तीच्या आत्मविश्वासात दिसत आहे.