सोलापूर -सोलापूर-अक्कलकोट महामार्गाचा लोकार्पण सोहळा ( Inauguration Ceremony of Solapur Akkalkot Highway ) सोमवारी 25 एप्रिल रोजी सोलापूर शहरात आयोजित करण्यात आला होता. 164 कोटी रुपये खर्च करून सोलापूर अक्कलकोट असा 42 किमी महामार्ग तयार झाला आहे. याचं लोकार्पण आज केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर बोलताना वापरण्यावर अधिक भर दिला. ऊस कारखानदारांना उसापासून इथेनॉलचा अधिक उत्पादन करा असा सल्ला देखील गडकरी यांनी यावेळी दिला. भविष्यात सोलापूरसह इतर ठिकाणी इलेक्ट्रिक मार्ग उभे करू, ज्या प्रमाणे इलेक्ट्रिक रेल्वे, इलेक्ट्रिक रोपवे चालतात त्या धर्तीवर इलेक्ट्रिक वायरीच्या आधारे बसेस किंवा डबल डेकर बसेस चालतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सोलापूर शहरातील उड्डाणपूल होणार- पाच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूलाची घोषणा केली होती. मात्र पाच वर्षात ते काम पूर्ण झालेच नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने 100 कोटी रुपये माझ्या खात्यातून देतो. सोलापूर शहरात लवकरच दोन उड्डाणपूलाच्या कामास सुरुवात होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.