महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद; माढ्यातील विठ्ठलवाडीच्या नितेश कदमची उपशिक्षणाधिकारी पदी निवड - विठ्ठलवाडीचा नितेश कदम राज्यात आठवा

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्यावतीने 420 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये नितेश कदम याने खुल्या संवर्गातून राज्यात 8 वा क्रमांक पटकवला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी व केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाले. तर, त्याने सायन्स शाखेची पदवी पूणे येथून घेतली.

Nitesh Kadam news
नितेश कदमची उपशिक्षणाधिकारी पदी निवड

By

Published : Jun 19, 2020, 9:59 PM IST

सोलापूर- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीसारख्या छोट्याशा खेड्यातील नितेश कदम यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे. नितेश कदम याची महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्यावतीने एप्रिल 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी वर्ग-2 पदी निवड झाली आहे. तो ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी नेताजी कदम यांचा मुलगा आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्यावतीने 420 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये नितेश कदम याने खुल्या संवर्गातून राज्यात 8 वा क्रमांक पटकवला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी व केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाले. तर, त्याने सायन्स शाखेची पदवी पूणे येथून घेतली. त्यानंतर कोठेही खासगी क्लास न लावता स्वतः अभ्यास करत त्याने हे यश संपादित केले आहे.

नितेशला पोलीस उपअधीक्षक सचिन कदम व सहाय्यक कक्ष अधिकारी सुदर्शन शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल नितेश कदमचे अभिनंदन करण्यात येत आहे. मोहन कदम, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांनीही अभिनंदन करत नितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details