सोलापूर - नीरा नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याने वेढले आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाला असून, उजनी धरण भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे.
नीरेच्या पाण्यामुळे पंढरीतील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा
भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भीमा नदीवरील ११५ टीएमसीचे उजनी धरण भरायला आणखी अवकाश असला तरी निरा नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा ही दुथडी भरून वाहत आहे.
भीमा व नीरा नदीच्या खोऱ्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या भागातील धरणे भरले आहेत. त्यामुळे नीरा नदीतून भीमा नदीत ३३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग येत असल्यामुळे भीमा नदी भरुन वाहत आहे. हीच भीमा नदी पुढे पंढरपुरात येते आणि पंढरपूरात नदीला चंद्रासारखा आकार असल्यामुळे याच नदीला पंढरपुरात चंद्रभागा नदी असे म्हणतात. नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पंढरपुरातील पुंडलीकाच्या मंदिराला सगळीकडून पाण्याचा वेढा आलेला आहे.