महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात नऊ जण गंभीर जखमी - सोलापूर लेटेस्ट न्यूज

मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्दमधील तुकाराम खरतडे, जयहिंद तुकाराम खरतडे, अक्षय जय हिंद खरतडे हे घराबाहेर झोपले होते. यांच्यावर लांडग्याने हल्ला केला. तर दुसरीकडे बावची येथील यशवंत राजू फोंडे, सुखदेव सिद्धु जाधव, तानाजी श्रीरंग चव्हाण, अनुसया बसवराज माळी, पार्वती वीरप्पा माळी, भारत विठोबा म्हमाणे हे लांडग्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाली आहेत. तसेच लांडग्याच्या हल्ल्यात या गावातील कुत्री, गाय व म्हशी यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी करण्यात आले आहे.

लांडग्याच्या हल्यात नऊ जण गंभीर जखमी
लांडग्याच्या हल्यात नऊ जण गंभीर जखमी

By

Published : Jun 14, 2021, 4:39 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -मंगळवेढा तालुक्यातील तीन गावात लांडग्याच्या हल्यात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तिघा जणांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. लांडग्याच्या हल्यामध्ये श्वान, गाय व म्हशी हेही जखमी झाले आहेत. हा हल्ला रात्री एकच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच भेट देऊन पाहणी केली आहे.

नऊ जण गंभीर जखमी

मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्दमधील तुकाराम खरतडे, जयहिंद तुकाराम खरतडे, अक्षय जय हिंद खरतडे हे घराबाहेर झोपले होते. यांच्यावर लांडग्याने हल्ला केला. तर दुसरीकडे बावची येथील यशवंत राजू फोंडे, सुखदेव सिद्धु जाधव, तानाजी श्रीरंग चव्हाण, अनुसया बसवराज माळी, पार्वती वीरप्पा माळी, भारत विठोबा म्हमाणे हे लांडग्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाली आहेत. तसेच लांडग्याच्या हल्ल्यात या गावातील श्वान, गाय व म्हशी यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी करण्यात आले आहे.

तालुक्यात भीतीचे वातावरण

मंगळवेढा तालुक्यातील तीन गावामध्ये लांडग्याने मानवी वस्तीमध्ये येऊन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुमारे नऊ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून पिसाळलेल्या लांडग्याला बंदी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -मुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय?; गँगस्टर फहिमच्या नावाने व्यावसायिकाला धमकीचे फोन

ABOUT THE AUTHOR

...view details