पंढरपूर - सोलापूच्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. गावनिहाय कोरोना रुग्णांची यादी तयार करुन कोणताही रुग्ण घरी राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्यास विलगीकरणात दाखल केले जात आहे. जादा रुग्णसंख्या असलेल्या गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे. यातून रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
तालुका प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी
मार्च महिन्यापासून पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या गावातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये जे नागरिक बाधित आढळतील त्यांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत. काही रुग्ण घरातच थांबत असल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही सचिन ढोले यांनी केले आहे.
कडक कारवाई