सोलापूर- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन संबंधित संयुक्त बैठक झाली. या बैठकीत खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऑक्सिजन पुरवठा करणारे डीलर, सब डीलर आणि ऑक्सिजन उत्पादन करणारे कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजन तुटवडा आणि बेडची व्यवस्था याचे नियोजन कसे करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मंगळवेढा रोडवर असलेल्या सीएनएस हॉस्पिटलने ऑक्सिजन उत्पादन करण्यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
योग्य नियोजन केल्यास सोलापुरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत-
सोलापुरातील आरोग्य प्रशासनाने रुग्णांवर उपचार करत असताना योग्य नियोजन करून उपचार केल्यास ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन हे शासनाकडून संबंधित रुग्णालयाला योग्य पुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पण आज देखील अनेक रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत.
ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-